| | |

अहिल्याबाई होळकर माहिती मराठी – Ahilyabai Holkar Information In Marathi, Biography, History, Mahiti, Birth, Death, Nibandh, Quotes, Jayanti

मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे एका नवीन आर्टिकल मध्ये आजच्या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहे, अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये, अहिल्याबाई होळकर माहिती मराठी – Ahilyabai Holkar Information In Marathi, Biography, History, Mahiti, Birth, Death, Nibandh, Quotes, Jayanti.

Ahilyabai Holkar Information In Marathi, Ahilyabai Holkar jayanti,
Ahilyabai Holkar Information In Marathi

Ahilyabai Holkar Information Marathi, Ahilyabai Holkar History In Marathi, Ahilyabai Holkar Mahiti In Marathi, ahilyabai holkar yanchi mahiti marathi, ahilyabai holkar yanchi mahiti marathi madhe, ahilyabai holkar information In marathi,

ahilyabai holkar quotes in marathi , ahilyabai holkar yanchi mahiti, ahilyabai holkar mahiti marathi, अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठीत वाचण्या साठी आमचे हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि त्यांच्या सर्व History बद्दल माहिती मिळवा.


अहिल्याबाई होळकर माहिती मराठी – Ahilyabai Holkar Information In Marathi

जन्मतारीख

३१ मे, १७२५

जन्मस्थळ

जामखेड

मृत्यूची तारीख: 

१३ ऑगस्ट, १७९५

मृत्यूस्थळ

इंदूर

वंशज

मालेराव होळकर, मुक्ताबाई होल्कर

अहिल्याबाई होळकर यांचे पूर्ण नाव

अहिल्याबाई खंडेराव होळकर

अहिल्याबाई होळकर – मूर्तिमंत देवी जणू!

बालमित्रांनो, नाशिकच्या रामकुंडावरील घाट, मंदिरे धर्मशाळा तुम्ही सर्वांनी पाहिल्याच असतील. रामकुंडावर गेल्यानंतर तेथील वातावरण पाहून मनं कसे प्रसन्न होऊन जाते. रामकुंडावरील प्रशस्त धाटांमुळे या धार्मिक स्थळाला खूप शोभा आली आहे.

 तुम्हाला साहजिकच कधीकधी प्रश्न पडत असेल की, हे एवढे सुंदर घाट कोणी बांधले असतील? मित्रांनो पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचे नांव तुम्ही कधी ऐकले आहे.

 तुमच्यापैकी बहुतेक जणाना अहिल्यादेवी माहीत असतील, मात्र त्यांची जीवनकहाणी किती जणांना माहीत आहे. अहिल्यादेवींचे चरित्र म्हणजे एक लखलखता जीवनप्रवाह आहे.

अहिल्यादेवी या अत्यंत पुण्यशील व धार्मिक होत्या.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरप्रमाणेच संपूर्ण भारतात त्यांनी प्रचंड कार्य उभारले. 

अनेक ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, विहिरी, तलाव, रस्ते, पाणी, अन्नछत्रे असे त्यांचे काम आपल्याला सापडेल. 

आहिल्यादेवींनी उभारलेल्या या कार्याचा लाभ आज दोनशेहून अधिक वर्ष झाली तरी गोरगरिबांना होत आहे.

 त्यांनी सुरु केलेल्या अन्नछत्रांमध्ये आजही हजारो भुकेले जीव आपली क्षुधा शांत करीत आहेत.

अहिल्यादेवी या केवळ धर्मपरायणच नव्हत्या तर, त्या अतिशय थोर अशा राजकीय मुत्सद्दीदेखील होत्या. राज्यकारभार कसा करावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.

 राज्य चालवितांना त्यांनी दाखविलेली असाधारण तडफ, खंबीरपणा, न्यायनिपुणता, प्रशासन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रजेबद्दल त्यांना असलेले अपरंपार प्रेम यांना आधुनिक इतिहासात तरी तोड नाही.

अहिल्यादेवी या बाणेदार वृत्तीच्या होत्या. त्यांचे चारित्र्य अतिशय उच्च होते. राहणी अत्यंत साधी होती.

 अहिल्यादेवींवर जे कौटुंबिक आघात झाले, तसे दुसऱ्या एखाद्या स्त्रीवर झाले असते तर ती कोलमडून पडली असती. पण अहिल्यादेवी या असामान्य होत्या. 

त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू अहिल्यादेवी केवळ पंचवीस वर्षाच्या असतांना झाला. हे कमी म्हणून की

काय, त्यांचे पुत्र मालेराव यांचे वयाच्या फक्त बाविसाव्या वर्षी निधन झाले. अहिल्यादेवींना आई-वडिलांसमान असणारे सासू-सासरे मल्हारराव आणि गौतमाबाई यांचाही मृत्यू अहिल्यादेवींनी पाहिला.

 पती खंडरावांबरोबर त्यांच्या नऊ सवती सती गेल्या. सासरे मल्हाराव यांच्याबरोबर त्यांच्या दोन सासवा सती गेल्या

एवढे सगळे जिवलग अहिल्यादेवींना सोडून गेले, तरीही त्यांच्यावरची संकटे संपली नव्हती.

 नातू नथोबा वयाच्या बाविसव्या वर्षी मरण पावला, त्यांच्याही दोन कोवळ्या बायका सती गेल्या. 

राहता राहिली होती ती कन्या मुक्ता. तिचा पती रोगास बळी पडला आणि मुक्ताही तिच्या दोन सवतींसह सती गेली. काळाचे प्रचंड आघात सोशीत असताना अहिल्यादेवी धीरोदात्तपणे उभ्या ठाकल्या. 

पाच आप्तांचे मृत्यू आणि अठरा स्त्रिया सती जाताना ज्या स्त्रीने पाहिल्या, तिचा जीवनावारचा विश्वासच उडून गेला असता. मात्र अहिल्यादेवी खचल्या नाहीत.

 प्रतिकूल परिस्थितीतही त्या कोणाला शरण गेल्या नाहीत. ईश्वरच आता आपला आणि आपल्या प्रजाजनांचा रक्षणकर्ता, अशी त्यांच्या मनाची पक्की धारणा झाली व त्यांचे व्यक्तिमत्त्व आपोआपच धर्मपरायण बनत गेले.

 राज्यकोशात पैशाचा ठणठणात असताना त्यांनी प्रजेच्या भल्यासाठी मोठी कर्जे काढण्यास मागेपुढे पाहिले नाही. 

अहिल्याबाई होळकर

त्या एकीकडे कर्जे फेडीत होत्या आणि दुसरीकडे प्रजाहिताची कामेही तेवढ्याच वेगाने राबवित होत्या. या कठीण परिस्थितीत अहिल्यादेवींचा स्वाभिमान जागृत राहिला. त्यामुळेच दोन शतकांनंतरही अहिल्यादेवींची समाज पूजा करतो. अहिल्यादेवींच्या आयुष्याची गोष्ट सर्वांसाठी स्फूर्तीदायी अशी आहे.

इंदूरची भाग्यलक्ष्मी – ahilyabai holkar mahiti in marathi

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म १७२५ मध्ये महाराष्ट्रातील चौढी येथे झाला. माणकोजी शिंदे-पाटील या वतनदाराच्या या कन्या होत्या. अहिल्यादेवी बालपणापासूनच अत्यंत चुणचुणीत, सुंदर आणि सात्विक अशा होत्या.

 पाहताक्षणीच त्या नजरेत भरत असत. माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या त्या सुनबाई कशा झाल्या, त्याची कहाणी मनोरंजक आहे.

 मल्हाररावांना खंडेराव नावाचे पुत्र होते. मल्हारराव हे अत्यंत शूर, मात्र दुर्देवाने खंडेरावांना तशी कर्तबगारी दाखविता आली नाही. खंडेराव हे व्यसनाधीन आणि गुलहौशी वृत्तीचे होते. 

राज्यकारभार नेटाने करण्यात त्यांना रस नव्हता. हे पाहून पिता मल्हारराव मनोमन हळहळत असत.

अहिल्याबाई होळकर

 खंडेरावांपेक्षा आपल्या प्रांताचे काय होणार, याची चिंता त्यांना लागून राहत असे. हे राज्य भरभराटीला यावे, अशी त्यांची इच्छा होती; मात्र खंडेरावांनकडून ती पूर्ण होईल असे दिसत नव्हते.

 खंडेरावांना खंबीर पत्नी मिळाली तर या राज्याला वाली मिळेल, असे मल्हरसावंना वाटत होते. ते सारखा हाच विचार करीत असत.

एकदा मल्हारराव रयतेची विचारपूस करण्याच्या हेतूने घोड्यावरुन सरदारांसह चालले होते. मनांत खंडेरावाचेच विचार घोळत होते.

 खंडेरावाला सुयोग्य सहचारिणी मिळाली म्हणजे आपण जबाबदारीतून मुक्त झालो, असा विचार त्यांच्या मनांत चालला होता. सोबत धनाजी होते. 

घोड्यावरुन रपेट सुरु होती. तोच त्यांना नदीकाठी एक मंदिर दिसले. त्यांनी धनाजीजवळ इच्छा व्यक्त केली, धनाजी आपण त्या मंदिरात जरा आराम करु या. 

धनाजीनेही मल्हाररावांची इच्छा उचलून धरली. मल्हारराव आणि धनाजी यांच्यासह चार सैनिक मंदिरात गेले. मंदिर महादेवाचे होते. तेथे पुजाअर्चा सुरु होती. .

 शिवभक्तांच्या, “शंभो शिवशंकर” या जयघोषाने वातावरण अतिशय पवित्र झाले होते. महादेवाचे दर्शन केल्यानंतर मल्हारराव मंदिराच्या बाहेर एका कट्ट्यावर टेकले. 

त्यांचे जोडीदारही मल्हारावांजवळ बसले. सकाळपासून घोडदौड केल्याने मंडळी थकली होती.

🔗 शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती

अहिल्याबाई होळकर

 सर्वांनाच प्रचंड भुक लागली होती, बरोबर न्याहारी आणलेली होतीच, शिदोरी सोडून न्याहारी करण्याचा बेत त्यांनी आखला.

 मंडळी पहिला घास तोंडात घालणार तोच एक चुणचुणीत मुलगी पुजेचे साहित्य घेऊन मंदिरात आली. त्या सुंदर आणि सात्विक मुलीला पाहून मल्हाररावांना वाटले, सून असावी तर अशी! मुलगी पूजेचे तबक घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात गेली.

 महादेवाला फुले वाहून अक्षता टाकल्या. पिंडीला हळदीकुंकू लावून उदबत्ती पेटविली. अत्यंत भक्तीभावाने भगवान शंकराला तिने प्रणाम केला. 

मल्हाराव तिच्या कृती पाहत होते. धनाजीने मल्हाररावांच्या मनांत काय चालले आहे, ते बरोबर ओळखले. ते म्हणाले, “सरकार मुलगी कशी चुणचुणीत आहे!” मल्हारराव म्हणाले, ‘महादेवाच्या मंदिरात गौरीच जणू अवतरली आहे.” धनाजी म्हणाले, “छोट्या सरकारांना अशी पत्ती मिळायला हवी.’ मल्हाराव त्यावर म्हणाले तुम्ही आमच्या अगदी मनातलं बोललात.

ती मुलगी परत जायला निघताच मल्हाररावांनी तिला बोलावून म्हटले, “मुली, देवाला नैवेद्य दाखविलास, मात्र आम्हाला प्रसाद नाही दिलास?’ यावर ती धीट मुलगी म्हणते कशी, “एवढ्या प्रसादानं तुमचं पोट कसं भरणार?

अहिल्याबाई होळकर

आमच्या वाड्यावर जेवायला चला,” मल्हारराव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. ती म्हणाली, “होय वाड्यावर, माणकोजी शिंदे पाटलांच्या वाड्यावर. 

त्यांची लेक आहे मी!” मल्हाररावांना मुलीची धिटाई खूप आवडली, ते आणि त्यांचे जोडीदार त्या मुलीच्या पाठोपाठ माणकोजींच्या वाड्यावर गेले. 

मल्हाररावांना पाहताच माणकोजी धावत-धावत आले. म्हणाले, “सरकार, आपली पायधूळ गरिबाच्या वाड्यावर झाडलीत. आम्ही पवित्र झालो. पण एवढ्या दूरवर मजल कशासाठी?”

“माणकोजी, मनी विचार आला, रयतेची ख्यालीखुशाली विचारावी. राज्यात काय चाललंय ते पाहावं, मल्हारराव असे म्हणत असतानांच धनाजी म्हणाले, आणि जमलं तर छोट्या सरकारांसाठी मुलगीही पाहावी! माणकोजी पाटील, राग मानू नका. तुमची जात हो कोणती?” ”

“जी, मल्हारबाबांची जी जात तीच आमची! धनगर. “मग जमलं तर. तुमची मुलगी होळकर सरकारांना पसंत पडली आहे.” धनाजी काय बोलत आहेत तेच माणकोजींना समजेना. ते म्हणाले, “काय बोलता धनाजी. कुठे सरकार आणि कुठे आम्ही?”

एवढा वेळ गंमतीने हा संवाद ऐकत असलेले मल्हाराव म्हणाले, 

अहिल्याबाई होळकर

“माणकोजी पाटील, अहो जातीत काय असतं? पराक्रम हा जसा जातीवर अवलंबून नसतो तसेच गरिबी आणि श्रीमंतीचेही आहे.

 एखाद्या राजघराण्यात सापडणार नाही असं रत्न तुमच्या पोटी जन्माला आलं आहे. 

तुमची मुलगी आमच्या खंडेरावांसाठी पत्नी म्हणून आम्हाला आवडली. तुमची काही हरकत नसेल तर आम्ही तिला आमची सून मानू का?”

मल्हाररावांचा हा प्रश्न ऐकून माणकोजी हबकूनच गेले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. म्हणाले, “सरकार, आमची कसली हरकत? गरिबाला सांभाळून घ्या म्हणजे झालं.

मल्हारराव म्हणाले, “माणकोजी तुम्ही आता आमचे सोयरें, आता आपण समान पातळीवर आलो. कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. ही शुभ वार्ता साऱ्या गांवाला सांगा. उद्याच आमच्या खर्चानं गांवाला जेवण घाला. ”

काही दिवासातच मल्हारावांनी पुरोहितांना बोलावून लग्नासाठी शुभ मुहूर्त निवडला. अहिल्यादेवी आणि खंडेराव यांचा थाटामाटात विवाह झाला. 

चौंढीची अहिल्या इंदूरात मल्हारराव होळकरांची सून म्हणून आली. अहिल्येला पाहून तमाम इंदूरकरांना वाटलं, इंदूरची भाग्यलक्ष्मीचं तिच्या पायांनी चालत आली!

🔗 सनी लियोन ची माहिती

अहिल्याबाई होळकर 

कर्तबगार अहिल्यादेवी – ahilyabai holkar mahiti marathi

अहिल्येचे पाय इंदूरच्या होळकर वाड्याला लागले आणि मल्हारराव होळकरांची दौलत झपाट्याने वाढू लागली. इंदूर राज्याच्या भरभराटीलां जणू उधाणं आले. 

मल्हारराव मुलुखगिरीला जेथे जात, तेथे त्यांना यश मिळू लागले. मल्हारावांचा दरारा आधीपासून होताच, तो आणखी वाढला. इंदूर राज्याची दौलत चौदा कोटींची झाली. 

अखिल हिंदुस्थानात मल्हारावांच्या नांवाचा डंका वाजू लागला. मल्हाररावांना वाटले, अहिल्येचाच हा पायगुण! त्यांच्या पत्नी गौतमीबाई यांची तर अहिल्या लाडकी लेकच झाली.

अहिल्यादेवी या बालपणापासूनच धार्मिक वृत्तीच्या होत्या. सासरी आल्यावर देखील त्यांचे देवाधर्माचे वेड बिलकुल कमी झाले नाही. मल्हारराव हे स्वतः सात्विक वृत्तीचे होते.

 राज्याची भरभराट झाली ती ईश्वराच्या कृपेमुळेच असा त्यांचा दृढ विश्वास होता. गौतमीबाई ह्याही धार्मिक आवड असणाऱ्या होत्या. अहिल्यादेवींच्या माहेरी जसे आध्यात्मिक वातावरण होते, तसेच सासरीदेखील असल्याने अहिल्यादेवी मनांतून अत्यंत खुश होती. त्या बालपणापासून महादेवाच्या भक्त होत्या. त्यांना होळकरवाड्यात एक शिवमंदिर उभारावे असे वाटत होते. 

अहिल्याबाई होळकर

एक दिवस त्यांनी शहरांत जाऊन महादेवाची सुबक आणि सुंदर अशी पिंड वाड्यात आणली. या पिंडीची प्रतिष्ठापना मल्हाररावांनी एक टुमदार शिवमंदिर बांधून केली.

 अशा सगळ्या धार्मिक वातावरणात अहिल्यादेवींचे मनं अगदी रमून गेले. त्या भल्या पहाटे उठत. स्नान करुन देवदर्शनाला जात. इंदूरात मुळातच मंदिरे भरपूर. 

या मंदिरांमध्ये जाऊन अहिल्यादेवी पूजाअर्चा करीत, रयतेचे भले व्हावे. अशी प्रार्थना करीत. सगळ्यांचे कल्याण व्हावे, अशी त्यांची नैसर्गिक मनोधारणा होती. दर्शन करुन आल्यावर त्या वाड्यावरील नोकरचाकरांच्या कामावर देखरेख करीत. 

आल्या गेल्यांचे आतिथ्य करणे, त्यांना मनांपासून आवडत असे. बालपणापासूनच धीट स्वभाव असल्याने होळकर वाड्यासारख्या प्रचंड कारभारात देखीत त्यांना भांबावल्यासारखे झाले नाही. 

काही दिवसातच त्या रयतेची लहान-मोठी कामे देखील करु लागल्या. त्यांची कामातील हुशारी पाहून मल्हारराव अत्यंत खुश होत.

 आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, असे त्यांना वारंवार वाटत असे. ही गोष्ट ते गौतमीबाईंना नेहमी बोलून दाखवत, पण त्यांच्या मनांतील पुत्र खंडेरावाची चिंता मात्र काही संपत नव्हती. खंडेरावाची मौज-मजा, व्यसनाधीनता, कारभाराकडचे दुर्लक्ष मल्हाररावांच्या मनाला खात होते.

अहिल्याबाई होळकर

 ही एवढी मोठी दौलत हा पोरगा कशी सांभाळणार, हा प्रश्न त्यांच्या मनांत सतावत असे. खंडेरावाच्या वागण्यामुळे गौतमीबाईही काळजी करीत असत. 

एक दिवस त्या मल्हाररावांना म्हणाल्या, “सरकार आपली सुनबाई खरोखर शहाणी आहे. वाड्यावर येणाऱ्या लोकांची कामेही ती करते. 

तिलाच आपण शहाणं केलं तर खंडूही त्यापासून काही बोध घेईल. यातून अहिल्या कारभारातही तरबेज होईल.” मल्हाररावांना पत्नीचे म्हणणे पटले. 

त्यांनी अहिल्याबाईंना राज्यकारभारासाठी निपुण करण्याचे ठरविले. शिक्षणासाठी उत्तम शिक्षकांची नेमणूक केली. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, प्रजाहितदक्षता यांचे धडे दस्तुरखुद्द मल्हाररावांनी अहिल्यादेवीला देण्यास सुरुवात केली.

 अहिल्यादेवी या जात्याच हुशार, त्यांना सर्वच विषयांमध्ये उत्तम गती होती. पुस्तकी शिक्षण राज्यकारभार करण्यासाठी पुरेसे नव्हते.

 राज्य सुरळीत चालवायचे म्हणजे राज्यकर्ता हा शूर असावा लागतो. त्याला शस्त्रे चालविता यावी लागतात. त्यासाठी मल्हाररावांनी अहिल्यादेवींना हे शिक्षणही द्यायला सुरुवात केली. अहिल्यादेवी घोड्यावरुन रपेट करु लागल्या. 

तलवारी चालवू लागल्या. भाला-बरची हाताळायला शिकल्या. अहिल्येची प्रगती पाहून मल्हारराव अत्यंत आनंदित ” झाले.

🔗 Funny Birthday Wishes In Marathi

अहिल्याबाई होळकर 

 मुलगा निकामी असले तरी सून मात्र सर्व बाबतीत तरबेज होत असल्याचे पाहून ते निश्चित झाले. असे असले तरी पोटचा गोळा सुधारावा, असे कोणत्या पित्याला वाटणार नाही? या विचाराने मल्हारराव अहिल्यादेवींना म्हणाले, “मुली तू कारभारात तरबेज झालीस.

 आता आणखी एक मोठी जबाबदारी तुला पार पाडायची आहे. आमच्या मुलाला सुधारता-सुधारता आम्ही थकलो. त्याला सावरण्याचे काम आता तुला करायचे आहे.

गौतमीबाई म्हणाल्या, “बाई, अनेक मुलं अशी असतात की, आई-बाप चांगले असतील तर त्यांना पटत नाही. 

हीच मुलं बायकांनी शिकविल्यावर मात्र ऐकतात. तू चतुर आहेस. कोणाबरोबर कसं वागावं, हे तुला चांगलं कळतं. खंडेरावाची अवस्था तू पाहतेसच. ही एवढी मोठी दौलत आणि वाली हा असा दिवटा. 

त्याला ताळ्यावर आणण्याचे काम तुला नक्की जमेल. इंदूरसाठी, होळकर घराण्यासाठी एवढं करशील?” आई-वडिलांच्या ठिकाणी असलेल्या सासू-सासऱ्यांचे हे बोलणे ऐकून अहिल्येला गहिवरुन आले.

 आपल्याकडून त्यांच्या किती मोठ्या अपेक्षा आहेत हे तिला माहीतच होतेच; पण तिची इंदूरसाठी किती निकड आहे, ते तिला नव्याने समजले.

अहिल्याबाई होळकर 

अहिल्यादेवी म्हणाल्या, “इंदूरच्या दौलतीसाठी, माझ्या सौभाग्यासाठी काहीही करायची माझी तयारी आहे. अहिल्यादेवींचे हे आश्वासक उद्गार ऐकून मल्हारराव आणि गौतमीबाई अत्यंत प्रसन्न झाले. 

अहिल्यादेवींने मनांत विचार सुरु केला, पतिदेवांना कसे सुधारायचे? अहिल्यादेवींना पुराणातल्या अनेक गोष्टी येत होत्या. या गोष्टी सांगून खंडेरावांना सद्बुद्धी सुचली तर बरेच असे त्यांच्या मनात आले. 

रात्री झोपण्यापूर्वी खंडेरावांना रामायण- महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या तर फरक पडेल, असे अहिल्यादेवींना मनापासून वाटत होते. 

एके दिवशी त्यांनी खंडेरावांना अशी गोष्ट सांगायचा बेत आखला, पण त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत खंडेराव महालात आलेच नाहीत. उशिरा कधीतरी खंडेरावांची स्वारी झुलत-झुलत महालात आली.

 अहिल्यादेवींनी त्यांच्या अंगावर घालून त्यांचे पाय चेपण्यास सुरुवात करताच खंडेराव त्यांच्या अंगावर जोरात ओरडले, पण तरीही न डगमगता अहिल्यादेवींनी पतीची सेवा सुरु ठेवली. 

मनांची हिंमत करुन त्यांनी अखेर विचारलेच, “महापराक्रमी मल्हाररावांचे पुत्र रोज-रोज उशिरा येतात म्हणजे कुठल्यातरी कामगिरीवर जात असतील. ही कामगिरी कोणती ते आम्हाला कळेल काय?” पत्नीचा थेट प्रश्न ऐकून खंडेराव चपापले आणि आपल्या हातून पाप घडत आहे याची त्यांना जाणीव झाली.

🔗 Tiger Shroff Information Marathi

अहिल्याबाई होळकर 

 त्या दिवसापासून हा शिरस्ताच झाला. खंडेरावांनी उशिरा यावे आणि अहिल्यादेवींनी जागत राहून त्यांची वाट पाहावी, त्यांची सेवा करावी, सेवा करता-करता, अहिल्यादेवी खंडेरा उचित गोष्टी सांगून चांगल्या कामासाठी त्यांचे मनं वळविण्याचा प्रयत्न करीत.

 त्याचवेळी मनांतून त्या परमेश्वराची करुणा भाकत. अहिल्यादेवींची ही प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि खंडेरावांना पत्नीचे म्हणणे पटायला लागले.

 त्यांची व्यसने सुटली, विनाकारण भटकणे थांबले. अहिल्येबद्दल मनांत प्रीती निर्माण झाल्याने ते घरांत लक्ष घालू लागले. एवढेच नव्हे तर मल्हाररावांबरोबर राज्यकारभारतही लक्ष घालु लागले. लांबवरच्या मुलुखात जाऊन पराक्रम गाजवू लागले.

 अहिल्यादेवींचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या अंगणात सुख धावून आले होते.

 याच सुखसमाधानाच्या काळात अहिल्यादेवींना मालेराव हा मुलगा आणि मुक्ता ही मुलगी झाली. त्यांचा संसार बहरला. हे सर्व पाहून मल्हारराव एक दिवस गौतमबाईंना

म्हणाले, “अहिल्येच्या रुपाने कोणी देवी तर आपल्या घरात अवतरली नसेल ना?” गौतमीबाई यावर म्हणाल्या, “सरकार, मलाही तसेच वाटते.’

अहिल्याबाई होळकर

सूनबाईने मुलाला वळण लावले, याचा खूप आनंद मल्हारराव आणि गौतमीबाई यांना झाला होता. 

जे काम आपल्याला आयुष्यभर जमले नाही ते अहिल्येने काही दिवसातच करुन दाखविले याचे त्यांना विशेष कौतुक वाटले. यामुळे आधीच प्रिय असलेल्या अहिल्यादेवींना कोठे ठेवू आणि कोठे नको असे त्यांना होऊन गेले. 

खंडेराव पित्याबरोबर मुलुखात जात, तेव्हा सर्व राज्यकारभार अहिल्यादेवी हाकीत असत. मल्हारराव आणि खंडेराव निघत तेव्हा अहिल्यादेवी म्हणत, “सरकार आपण निश्चितपणे मुलुखगिरी करा. इकडच्या कारभाराची चिंता करु नका. 

तुम्ही राज्याचा विस्तार करा. आम्ही प्रजेचे पालन करतो.” मल्हाररावांचा सुनेवर विश्वास असल्याने ते अहिल्यादेवींच्या हाती सर्व कारभार सोपवून स्वारीवर जात.

 प्रजेवर आईची माया – अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठी

 

 मल्हाररावांच्या अनुपस्थितीत अहिल्यादेवी माळवा प्रांताचा कारभार समर्थपणे करीत असत. त्या अत्यंत कर्तव्य कठोर होत्या. राज्यकर्त्याला साजेशी अशी त्यांची दिव्य बुद्धी होती. त्यांच्याजवळ मोठी दूरदृष्टी होती. आजच्या काळातही आदर्श ठरेल, असे कामकाज त्यांनी दोनशे वर्षापूर्वी करुन ठेवले.

अहिल्याबाई होळकर

 वस्त्रोद्योग आणि ग्रामपंचायतींच्या त्यांनी राबविलेल्या योजना आजकालच्या राज्यकर्त्यांचा डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. प्रजेच्या हितासाठी त्या कोणत्याही तडजोडी करायला तयार होत्या.

 अहिल्यादेवींनी दानधर्म फार मोठ्या प्रमाणात केला. त्यांनी मंदिरे घाट, दर्गे उभारण्यासाठी मोठा खर्च केला. या दानधर्मामागे आणि धार्मिक कार्यामागे त्यांचा हेतू अत्यंत विशाल असा होता. 

त्यातून समान्य जनतेला लाभा व्हावा, गोरगरिबांना अन्नपाणी मिळावे, ज्या धर्मस्थळांकडे पैसा नाही त्या धर्मस्थळांची चांगली व्यवस्था राहावी या उद्देशाने राज्याच्या खजीन्यातील मोठे धनं कामास आणले.

 मात्र काही इतिहासकार त्यांच्या वृत्तीवर टीका करतात. अहिल्यादेवींनी केलेल्या मोठ्या दानधर्माला या इतिहासकारांचा आक्षेप आहे. पण प्रत्यक्षात अहिल्यादेवींनी जे पुण्याचे काम करुन ठेवले आहे.

 त्याचे दृश्य स्वरुप आपण आज पाहत आहोत. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर अनेक राज्यात अहिल्यादेवींनी मंदिरे, धर्मशाळा उभारल्या आहेत. त्यांचा लाभ भाविकांना होत आहे. त्यांनी जुन्या काळात केलेली कामे आज करायची म्हटली तर अब्जावधी रुपये देखील कमी पडतील. त्यामुळे त्यांनी देशावर केलेले उपकार विसरता येण्यासारखे नाहीत.

🔗 वाघाची माहिती

अहिल्याबाई होळकर 

अहिल्यादेवी या रुढीप्रिय होत्या. दानधर्म, कर्मकांड यांच्यात त्यांचा बराचसा वेळ जात असे, मात्र त्यातूनही त्यांनी जनकल्याणच साधले. प्रत्येक क्षणाला त्यांना प्रजेच्या हिताची जाणीव असे. त्यांचे चारित्र्य अतिशय उच्च दर्जाचे होते. 

धार्मिक प्रभावामुळे आपोआपच त्या एखाद्या तपस्विनीप्रमाणे जगल्या. धनांची ददात नसताना शुभ्र वस्त्राशिवाय त्या काही नेसल्या नाहीत. 

कुशाग्र बुद्धिमुळे प्रत्येक काम त्या हुशारीने तडीस नेत. धर्मनीतीच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरु शकणार नाही. त्यांची न्यायबुद्धी उच्च कोटीची होती. कोणताही न्यायनिवाडा करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्या काळजी घेत. 

पुष्कळवेळा न्यायदानानंतर एक बाजू नाराज होते. अहिल्यादेवींच्या निकालानंतर मात्र दोन्ही बाजू त्यांना दुवाच देत. आपली प्रजा सतत सुखात राहावी, अशी त्यांची इच्छा असे. 

यासाठी त्या घरगुती बाबींमध्येदेखील हस्तक्षेप करायला घाबरत नसत. एकदा त्या इंदूरमध्ये फिरत असताना एक सावकार बायको आणि मुलांसह चालला होता. त्याची बायको गरोदर होती. तिच्या हाताला एका मुलाने धरले होते व दुसरे मूल कडेवर होते. सावकार पुढे आणि बायको, दोन मुले आणि अवजड पोट सांभाळीत कशीबशी सावकारामागे चालली होती. 

अहिल्याबाई होळकर

अहिल्यादेवींनी हे पाहिले आणि त्यांना स्वार्थी सावकाराचा राग आला. त्या घोड्यावरुन उतरल्या आणि सावकारासमोर जाऊन म्हणाल्या “शेठजी, बाईंना कितवा महिना आहे?” शेठजी म्हणाले, “नववा”, त्यावर अहिल्यादेवींनी हुकूम सोडला, आता असं करा, या मुलांना तुमच्याजवळ घेऊन बाईंना त्यांच्या माहेरी पोहोचवा.

 नंतर माहेरी धनधान्य पाठवा. आतापर्यंत केले तसे दुर्लक्ष या काळात तरी त्या बिचारीवर करु नका!” अहिल्यादेवींचा आदेश ऐकून सावकाराची बोबडी वळवली आणि क्षमायाचना करुन त्याने पत्नीला एका घोडागाडीने माहेरी पोहोचवले. 

अशा प्रकारे अहिल्यादेवींनी एका महिलेवरील अन्याय दूर केला. प्रजाजन दुःखी असलेले त्यांना सहन होत नसे.

 गरिबांवर श्रीमंतांनी अन्याय केला तर त्याची त्या तातडीने दखल घेत व संबंधित गरिबांच्या पोटापाण्याची त्या व्यवस्था करीत.

 एकदा नगरात फिरत असताना उधारी बाकी असलेल्या एका गरीब व्यक्तीला दुकानदाराने धरल्याचे त्यांनी पाहिले.

 “आधीची बाकी दिल्याशिवाय वाणसामान मिळणार नाही, असे दुकानदार त्या फाटक्या इसमाला बजावीत होता. अहिल्यादेवींनी लागलीच तेथेच निवाडा केला. 

गरिबाला विचारले, “तू दुकानदाराची उधारी का दिली नाहीस?” त्यावर तो म्हणाला, “सरकार, महिनाभर कामच मिळाले नाही, मग पैसा कोठून येणार? आणि आता महिनाभर उधारीने घेतले नाही तर खाणार तरी काय?” अहिल्यादेवींनी त्याच्या रोजगाराची व्यवस्था करुन दिली.

 तसेच वेळच्या वेळी उधारीचे पैसे देण्यासही बजावले, अशा रीतीने दोन्ही बाजूंनी पसंत पडेल अशा न्याय त्यांनी दिला. 

अहिल्याबाई होळकर 

सा न्याय देताना आपला आणि परका असा भेदभाव त्यांना मंजूर नव्हता. अन्याय करणाऱ्या आपल्या पुत्राचाही मुलाहिजा त्यांनी बाळगला नाही. 

एकदा मल्हारराव आणि खंडेराव स्वारीवर गेले असताना अहिल्यादेवीनी दरबार भरविला. खोळंबलेल्या सर्व कामांवर निर्णय घेऊन त्यांची अमलबजावणी करण्याचा आदेश अहिल्यादेवींनी दिला. 

तोच त्यांच्या कानी दरबाराबाहेर काही गडबड सुरु असल्याचे कळले. त्यांनी कारभाऱ्यांना विचारले, “बाहेर काय गडबड आहे?” कारभारी उत्तरले, “सरकार, अतिशय किरकोळ प्रकरण आहे.

 आपण त्यात लक्ष घालू नये.” अहिल्यादेवींना संशय आला. त्यांनी चढ्या सुरात सांगितले, कारभारी, आम्ही ते सांगतो ते करा. बाहेर गोंधळ करणाऱ्या ब्राह्मणांच्या एका गटाला दरबारात आणले गेले. अहिल्यादेवींनी त्यांना शांत राहण्यास सांगून .

🔗 Blogging Meaning In Marathi

अहिल्याबाई होळकर

त्यांची तक्रार विचारली. त्यावर एक ब्राह्मण म्हणाला, “सरकार, आम्ही जप करीत असताना आमच्या कमंडलुत कोणीतरी विंचू टाकते. गेल्या काही दिवसांपासूनच हा प्रकार सुरु आहे.

 अति झाल्याने आम्ही आपल्याकडे न्याय मागायला आलो आहोत.” हे ऐकून अहिल्यादेवींचा संताप अनावर झाला. त्यांनी हुकूम सोडला, “कारभारी ब्रह्मवृंदाची थट्टा करणाऱ्या अपराध्याला आमच्यासमोर आणा.

‘ हे ऐकून कारभारी खाली मान घालून उभे राहिले. उत्तर देणे टाळू लागले. ते पाहून दुसरा ब्राह्मण म्हणाला, “सरकार, अपराधी वाड्यातलाच आहे. त्याला शिक्षा होईल का?’ अहिल्यादेवी उत्तरल्या, “अपराधी कोणीही असो, त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला जरुर होईल.”

 त्यांनी कारभाऱ्यांना आदेश दिला, अपराध्याला समोर आणल्याशिवाय दरबार बरखास्त होणार नाही. कारभाऱ्यानी बाहेर जाऊन अहिल्यादेवींचा पुत्र मालेराव याला दरबारात हजर केले. त्याला पाहून अहिल्यादेवींना वाईट वाटले. 

आपला पुत्राला दुसऱ्याच क्षणी त्यांनी शिक्षा फर्मावली, “कारभारी या गुन्हेगाराला चाबकाचे फटके मारा. शिक्षा अमलात आणण्यास कारभाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. 

अहिल्यादेवी आसनावरुन उठल्या आणि हातात कोरडे घेऊन मालेरावाला पाच फटके लगावले. राज्यकर्ता या नात्याने त्या ” कठोरपणे शिक्षा करीत होत्या, मात्र दुसरीकडे पुत्राचे प्रताप पाहून मनोमन आसवे ढाळीत होत्या.

अहिल्याबाई होळकर 

वज्राघात आणि वज्रनिर्धार – ahilyabai holkar yanchi mahiti marathi

अवघ्या मराठी मुलुखावर त्या काळी पुण्याच्या थोरल्या माधवराव पेशव्यांचा अंमल होता. पेशव्यांनी माळवा प्रांताची सुभेदारी मोठ्या विश्वासाने मल्हाररावांकडे सोपवली होती. 

अहिल्याबाईंचे साहाय्य राज्य कारभारात लाभत असल्याने त्यांचेही काम सोपे झाले होते. त्यातच खंडेरावांच्या वर्तनातही सुधारणा झाल्याने मल्हाररावांना माळवा प्रांताचे भाग्य उजळल्याचा भास होत होता.

अशातच दसऱ्याचा सण आला. इंदूरच्या चौकाचौकातून दसऱ्याच्या स्वाऱ्या निघाल्या. तुताऱ्यांच्या नादात इंदूरचे राजे मल्हारराव होळकर यांचा जयघोष होत होता. 

अहिल्यादेवी परिपक्व झाल्या होत्या. त्यांचा दरारा सर्वत्र वाढला होता. धर्म आणि राजकारण त्या सहजपणे सांभाळत होत्या. सर्वत्र कीर्ती पसरली होती. दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

मल्हाररावांना सर्वच शत्रू दचकून असल्याने मराठ्यांच्या मुलुखात आगळिक करण्याची कोणाची हिंमत नव्हती. 

अहिल्याबाई होळकर 

मात्र सुरजमल जाटाने हे धाडस केले. त्याने उत्तरेतील जहागिरदारांना आधीच हैराण करुन सोडले होते. 

सुरजमल हा दरोडेखोरांचा सरदारच होता. या कारवायांमधून त्याने अफाट संपत्ती जमविली होती. इंग्रजांना मराठ्यांच्या मुलुखात आणि आसपास अस्थिरता हवीच होती.

 सुरजमलच्या रुपाने त्यांच्या हाती चांगलेच कोलित सापडले होते. इंग्रज त्याला चिथावणी देत होते. त्याच्याकडे शस्त्रांचा तुटवडा असल्याने शस्त्रे व दारुगोळाही पुरवित होते.

 यामुळे सुरजमलचा स्वतःच्या शक्तीबद्दल गैरसमज निर्माण झाला. त्याने मल्हाररावांच्या अधिपत्याखालील मराठी मुलुखात उचापती सुरु केल्या. सुरजमलाचे कारनामे थोरल्या माधवरावांच्या कानांवर गेले. पेशव्यांनी सुरजमलाची खोड जिरवायचा निर्णय घेतला.

 राघोबादादांच्या नेतृत्त्वाखाली पुण्याहून मराठी फौज निघाली, वाटेत त्यांना शिंदे, भोसले, गायकवाड हे पराक्रमी सरदार येऊन मिळाले. इकडे मल्हाररावांना पेशव्यांचा आदेश मिळाला होता.

 मल्हाररावांनी उत्तरेकडे निघण्याची तयारी केली. खंडेरावाला बरोबर घेण्याचे ठरविले. खंडेराव स्वारी निघण्यास तयार झाला मात्र अहिल्यादेवींनी बरोबर यावे अशी अट त्याने घातली. अहिल्याबाईंनी स्वतःलाही लढाईत उतरण्याची इच्छा होतीच. 

अहिल्याबाई होळकर 

त्यांनी मल्हाररावांच्या कानावर आपला मनोदय घातला. जशी तुमची इच्छा, म्हणून मल्हारराव खंडेराव आणि अहिल्येसोबत स्वारीवर निघाले.

पेशव्यांच्या संयुक्त फौजानी आगेकूच केली. सुरजमल पेशव्यांचे अफाट बळ पाहून घाबरला, फौजा पुढे जात होत्या आणि सुरजमल मागे हटत होता. 

मराठी फौजांनी अवघा मुलूख सुरजमलाच्या कचाट्यातून मुक्त केला. त्याने माघार घेतली मात्र तो कुंभेरीच्या किल्ल्यात लपला. सुरजमल हा अतिशय चिवट होता. 

कधीही तो उचल खाण्याची शक्यता होती. मल्हाररावांना त्याचा भरवसा वाटत नव्हता. त्यांनी आपली भावना रघुनाथराव पेशव्यांच्या कानी घातली. 

रघुनाथ म्हणाले, “मल्हारराव तुम्ही उगीच चिंता करता. सुरजमलाचा आता पुरता बिमोड झाला आहे.” हे संभाषण अहिल्यादेवी ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, “सरकार, मध्येच बोलते माफ करा. 

पण सुरजमलाचा पुरता नायनाट केल्याशिवाय साऱ्या मुलुखाला सुख मिळणार नाही. त्याचे पूर्ण पारिपत्य केलेच पाहिजे. त्याची खोड जिरविली म्हणजे त्यालाही पापाचे प्रायश्चित्त मिळेल आणि त्याला पुढे करणाऱ्या इंग्रजांनाही शह बसेल.” अहिल्याबाईंचे हे मुत्सद्दीपण पाहून राघोबादादा खुश झाले व सर्वानुमते कुंभेरीला वेढा घालण्याचा निर्णय झाला.

अहिल्याबाई होळकर

 मराठ्यांनी सुरजमलाभोवती फास आवळला. किल्ल्यातील शिबंदी संपू लागली. काही दिवसातच सुरजमल शरण येईल, असा विश्वास मराठ्यांना वाटत होता.

 मात्र सुरजमल अत्यंत चिवट होता. त्याचा प्रतिकार थांबत नव्हता. तशातच अहिल्यादेवींवर वज्राघात करणारी ती घटना घडली. दोन्ही बाजूंमध्ये घमासान युद्ध पेटले. खंडेराव मोर्चा सांभाळून होता. फौजेचे नियंत्रण करीत होते.

 तोच शत्रूपक्षाकडून एक तोफगोळा सुटला आणि खंडेरावांचा त्याने नेमका वेध घेतला. ते जबर जखमी झाले आणि काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले. 

पतीच्या देहावर पडून अहिल्यादेवी शोक करु लागल्या. मल्हारराव आणि गौतमीबाई यांचा धावा करु लागल्या. मल्हारराव धावत आले आणि गतप्राण-पुत्राला पाहून त्यांना भोवळच आली.

 एकुलता एक पुत्र दगावल्याने मल्हाररावांचे सर्वस्व लुटले गेले होते. त्यांनी सुरजमलाची निःपात करण्याची प्रतिज्ञा केली. इकडे अहिल्याबाईंचा विलाप सुरु होता. 

पतीबरोबर सुखाचे दिवस आले असे वाटत असतानाच काळाने त्यांना हिरावून नेले होते. अहिल्याबाईंना आयुष्यात रस वाटेना. त्यांनी खंडेरावांबरोबर सती जाण्याचा निर्णय घेतला. शुभ्र वस्त्र नेसल्या. कपाळी मळवट भरला. 

अहिल्याबाई होळकर 

मोत्यांच्या माळा ” घातल्या. खंडेरावांचे मस्तक मांडीवर घेऊन निश्चलपणे बसून राहिल्या. अहिल्याबाई सती जाणार, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

मल्हारराव, गौतमीबाई, होळकरवाड्यातील सगळे आप्त धावत आले. मल्हाररावांनी तर टाहोच फोडला. अहिल्यादेवींच्या पायावर डोके ठेवून म्हणाले, “अहिल्ये, तू गेलीस तर या दौलतीचं काय होणार? या म्हाताऱ्याला असं दुःखी करुन जाऊ नकोस.”

 अहिल्यादेवी म्हणाल्या, “होता होईल तेवढा पतिव्रता धर्म मी पाळला. आता शेवटचा धर्म मला पाळू द्या. अहिल्यादेवींचे उद्गगार ऐकून गौतमीबाई बेशुद्ध पडल्या.

 मल्हारराव आकांत करु लागले, “बाई, माझी गुरुदक्षिणा मला दे. माझ्या पदरात भीक घाल. तू गेलीस तर गोरगरीब प्रजेने कोणाकडे पाहयचे? तुला सगळा कारभार शिकवला तो याचसाठी का?” अहिल्यादेवी पेचात पडल्या, एकीकडे त्यांना जीवन संपवावेसे वाटत होते आणि दुसरीकडे मल्हारराव म्हणतात तेही पटत होते.

 अखेर त्यांनी मनांचा हिय्या केला आणि स्वतःला सावरुन सती जाण्याचा निर्णय बदलला. खंडेरावांच्या इतर बायका अहिल्यादेवींच्या पायावर डोके ठेवून सरणावर चढल्या. अहिल्यादेवींनी मात्र प्राणपणाने माळव्यांची दौलत सांभाळायचा वज्रनिर्धार केला होता. 

अहिल्याबाई होळकर माहिती

आधारवड कोसळला – ahilyabai holkar yanchi mahiti

पतीच्या निधनाचे दुःख गिळून अहिल्यादेवी कारभार करीत होत्या. पुत्र मालेराव ही त्यांची एकमेव आशा होती, मात्र मालेराव हा दिवटा निघाला. 

लहानपणापासूनच तो वात्रट होता. वाड्यावर येणाऱ्या लोकांना त्रास देण्यात त्याला मजा वाटत असे. पाहुण्यांना खडे मारणे, दरबारात आलेल्या नागरिकांच्या अंगावर घाण फेकणे व हे प्रकार करुन फिदीफिदी हसणे हे त्याचे आवडते उद्योग होते. 

मालेराव वयाने मोठा झाला तरी त्याच्यात फरक पडेना. यामुळे अहिल्यादेवी दुःखी होत्या. लग्न केल्यावर सुधारेल, या हेतूने त्याचा विवाह मैना नांवाच्या सुंदर मुलीशी करुन देण्यात आला, पण तरीही मालेराव सुधारेना. 

तो कोवळ्या मैनालाही त्रास देत असे. त्याचे छंद फंदही वाढले होते. दौलतीचा वारसदार असा कुचकामी निघाल्याने अहिल्यादेवी मनोमन दुःखी होत. यातून एक मात्र झाले, घराण्याची इज्जत आता आपल्यालाच सांभाळली पाहिजे असा निश्चय त्यांनी केला.

अशातच मल्हाररावांची प्रकृती ते आलमपूर येथे स्वारीवर असतानाच बिघडली. त्यावेळी ग्वाल्हेरचे महादजी शिंदे हे मल्हारावांचे प्राणप्रिय सहकारी होते. शिंदे-होळकरांच्या

अहिल्याबाई होळकर 

परक्रकामांमुळे मध्य भारतात पेशव्यांचा डंका वाजत होता. मल्हाररावांनी महादजींना बोलावून घेतले. आपला अंतकाळ जवळ आला आहे, असे मल्हाररावांना वाटत होते. 

आपल्या पश्चात अहिल्यादेवींच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन त्यांनी महादीकडून घेतले. महादजींनी तसा शब्द मल्हाररावांना देताच तो वटवृक्ष कोसळला.

 अहिल्यादेवींवर मोठा आघात झाला. आपण अगदी निराधार झालो आहोत, असे त्यांना वाटू लागले. सर्वसंगपरित्याग करुन तीर्थयात्रेला निघून जावे, असा बेत त्यांनी मनांत पक्का केला. त्या आलमपुराला आल्या. महादजींनी त्यांना मल्हाररावांचे शेवटचे बोलणे सांगितले.

 ही दौलत आता तुम्हीच सांभाळा, अशी समजूत महादजींनी घातल्याने अहिल्यादेवींना पुन्हा एकदा घेतलेला निर्णय बदलावा लागला. इंदूरला परतून त्यांनी दरबार भरवला. 

आपल्या मार्गदर्शनाखाली मालेराव राज्यकारभार करील, अशी घोषणा केली. पण मालेराव चंचल वृत्तीचा होता. तो कधी कारभारात लक्ष घालीत असे तर कधी वेड्यासारखे वागत असे. अशातच त्याला मानसिक विकाराने ग्रासले आणि त्यातच त्याचाही अंत झाला.

अहिल्याबाई होळकर

शोकात्म अखेर – मृत्यू – ahilyabai holkar death reason

इंदूरच्या गादीची अवस्था एकापाठोपाठ बसलेल्या धक्क्यांनी बिकट झाली होती. अहिल्यादेवींना विरक्ती आली होती. संकटे संपत नसल्याने त्या हतबल झाल्या होत्या. 

जवळच्या माणसांजवळ राज्यकारभात सोडून हिमालयात जाण्याची इच्छा त्या व्यक्त करीत. अहिल्याबाईंची ही अवस्था पुण्यात राघोबादादापर्यंत गेली.

 त्यांच्या मनांत मोह निर्माण झाला. इंदूरची गादी पुणे दरबाराला जोडण्याचे विचार मनांत घोळू लागले. पन्नास हजाराची फौज घेऊन राघोबादादा इंदूरच्या दिशेने निघाले. 

याला माधवराव पेशव्यांची मान्यता नव्हती. होळकरांच्या दौलतीची अभिलाषा पेशव्यांना नसल्याचे त्यांनी कळविले. अहिल्याबाईंनी राघोबादादाच्या रुपाने आलेल्या संकटाचा सामना करण्याचे ठरविले.

 शिंदे, गायकवाडांना मदतीला बोलावून घेतले. राघोबादादाला एक पत्र पाठविले. त्यात म्हटले, “मी एक बाई असेपर्यंत गादीसाठी लढेन. आपण आम्हाला हरविले तरी पेशव्यांनी एका स्त्रीचा पराभव केला अशी नोंद होईल.

 मात्र आपण पराभूत झाला तर काय होईल, याचा विचार करा. हे पत्र वाचून राघोबादादा खजील झाले. अहिल्याबाईंच्या दरबारात आले. त्यांचा मानपान ठेवून अहिल्याबाईंनी कठोर शब्दांत त्यांनी कानउघडणी केली.

अहिल्याबाई होळकर 

 राघोबादादांच्या लक्षात त्यांची चूक आली. अपमानित होऊन ते पुण्याला परतले.

अहिल्याबाईंना आता कन्या मुक्ताच्या विवाहाची काळजी लागली होती, त्यासाठी त्यांनी दरबार भरविला. दौलतीला त्रास देणाऱ्या चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त जो करील, त्याला मुक्ता वरेल, असे त्यांनी जाहीर केले.

 हा पण उचलण्यास कोणी तयार नसताना यशवंतराव फणसे हा सरदार पुढे झाला आणि त्याच्याशीच मुक्ताचा अहिल्याबाईंनी विवाह लावून दिला. त्या काळातदेखील अहिल्याबाईंनी उचललेले हे सुधारणावादी पाऊल कौतुक करण्यासारखे आहे.

उत्तरेतील राजपुतांचा बिमोड अहिल्याबाईंनी केला. या लढाईत त्या स्वतःच सहभागी झाल्या होत्या. होळकरांच्या फौजेने चंद्रावत राजपुतांचा धुव्वा उडविला.

 तिकडे पुणे दरबारात राघोबादादांची कृष्ण कारस्थाने सुरु होती. तेथील भाऊबंदकीमुळे अहिल्याबाईंनी पुण्यास महसूल पाठविणे बंद केले या रकमेचा वापर करन समाजोपयोगी कार्य सुरु केले.

 महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरु केली. अन्नछत्रे घातली. अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. गुजराथेतील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. 

अहिल्याबाई होळकर

असे पुण्यसंचयाचे काम अहिल्यादेवी करीत होत्या. तशातच त्यांचा नातू तेराव्या वर्षी मरण पावला. काही दिवसातच जावई लढाईत कामी आला आणि मुलगीही सती गेली. 

आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता. त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर १७९५ मध्ये तुकोजीच्या हाती सत्ता सोपवून त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले. भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नांव सतत दुमदुमत राहील.

Credit Writer : Unmesh

Please : या लेखात काही gramatical mistakes असू शकतात, कृपया तुम्हाला काही चुका किंवा चुकीची माहिती आढळल्यास लगेच कंमेंट मध्ये सांगा, धन्यवाद…

लक्ष्य दया: तुम्हाला महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल ची माहिती – ahilyabai holkar yanchi sampurn mahiti, ahilyabai holkar mahiti, ahilyabai holkar mahiti marathi madhe, ahilyabai holkar information in marathi, ahilyabai holkar details in marathi, ahilyabai holkar information in marathi in short, ahilyabai holkar in marathi, ahilyabai holkar mahiti in marathi, punyashlok ahilyabai holkar information in marathi, ahilyabai holkar full information in marathi, ahilyabai holkar death reason, ahilyabai holkar jayanti, आवडली असेल तर कमेन्ट नक्की करा.

Note: आम्हाला आशा आहे की ही माहिती महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र – Ahilyabai Holkar Information in Marathi हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

हा लेख आवडला असेल तर मग तुमच्या मित्र – मैत्रिणीला  Share करायला विसरु नका .. आणि अशाच मराठी माहिती साठी Marathijosh.in ला भेट द्या. आणि हा लेख share करायला विसरू नका.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर..अहिल्याबाई होळकर निबंध..
होळकर वंशावळ..पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर के कार्य पढो.. और प्रमुख मुद्दे बताओ..अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे नाव काय..

अहिल्याबाई होळकर शायरी..अहिल्याबाई होळकर यांचे पूर्ण नाव..अहिल्याबाई आणि रूढी परंपरा हा पाठ कोणी लिहिला आहे..अहिल्याबाई होळकर माहिती मराठीत..

अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठीत..अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी मराठी माहिती ..अहिल्याबाई होळकर यांची माहिती मराठी..अहिल्याबाई होळकर माहिती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *