मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते | Marathi Bhasheche Shivaji
Marathi Bhasheche Shivaji
Marathi Bhasheche Shivaji |
मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?
1. दादोबा पांडुरंग तर्खडकर
2. बाळशास्त्री जांभेकर
3. विष्णुशास्त्री चिपळूणकर
4. यापैकी नाही
उत्तर : 3. विष्णुशास्त्री चिपळूणकर
मराठी भाषेचे शिवाजी कोण होते ? – Marathi Bhasheche Shivaji
विष्णुशास्त्री कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांचा (जन्म २० मे १८५० आणि मृत्यू १७ मार्च १८८२). यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार आहे.
त्यांच्या अगोदर आधुनिक मराठी गद्य जवळजवळ अर्ध्या शतकाहून अधिक काळ निर्माण होत होते परंतु त्यांनी त्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
त्यांच्या डौलदार आणि ,प्रभावी भाषाशैली मुळे,त्यांना ही उपाधी देण्यात आलेली आहे.
विष्णुशास्त्र्यांचा जन्म हा पुण्याचा. मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेजा’तून ते उत्तीर्ण झाले होते.
(१८७२) त्यानंतर त्यांनी पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. (१८७२–७९). विष्णुशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृतज्ञ.
इंग्रजी साहित्याचे जाणकार, रसिक, विद्वान आणि चतुरस्त्र मराठी लेखक ते असल्यामुळे विष्णुशास्त्र्यांनाही लेखनवाचनाची गोडी ही लागली.
निबंधमाला
कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा सुरुवात/ आरंभ झाला (१८६८) व त्यानंतर काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले.
तथापि त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी ह्यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक हे बंद पडले (१८७५).
सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी निबंधमाला, हे सुप्रसिद्ध मासिक काढले होते (१८७४). तसेच ज. बा. मोडक आणि का. ना. साने ह्यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह हे मासिक सुरू केले होते (१८७८).
आपल्या देशातील लोकांनी रचिलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे, हा हे मासिक काढण्यामागील त्यांचा हेतू होता. तथापि ह्या मासिकावर विष्णुशास्त्र्यांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते.
१८८० मध्ये नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक-आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही ख्यातनाम शाळा स्थापन चालू केली.
त्याच वर्षी कडव्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी दोन वृत्तपत्रे – केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी-त्यांनी वृत्तपत्रे काढली. ह्यांशिवाय चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबखाना ह्यांसारखे समाजशिक्षणोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले होते.
आपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती आहे.
‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध हे आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जयंती निमित्त आदरयुक्त नमन अभिवादन.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर
२० मे १८५० रोजी जन्मलेला या अवलिया ने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सोबत देशात क्रांती घडवणारी “केसरी” व “मराठा” हि वृत्तपत्रे त्यांनी सुरु केली.
पुण्यातील ब्रिटीश विद्यालयांपेक्षा उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या “न्यू इंग्लिश स्कूल” च्या स्थापनेतही विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा सहभाग मोलाचा होता.
महाराष्ट्राचा इतिहास व काव्य सहज सोपा लोकांपर्यंत पोचावा या करिता त्यांनी “काव्येतिहास” हि लेखमाला देखील प्रसिद्ध केली होती.
सोबतच आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा नामक दोन प्रकाशनसंस्था व वाचकांना सहज पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून पुण्यात “किताबखाना” नामक पुस्तकांचे भांडार ते चालवीत होते.
ते मुख्यत्वे ओळखले जातात ते त्यांच्या “निबंधमाला” या लेखमाले बद्दल,या लेखमालेतील “मुद्रणस्वातंत्र्य” व “आमच्या देशाची स्थिती” हे दोन लेख त्यांचे तत्काली खूप गाजलेले होत.
हे पण वाचा :-